दादांची आठवण आणि मुख्यमंत्री अर्थसंकल्पीय अधिवेशनात भावनिक

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Maharashtra budget session 2026, आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधानसभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडत त्यांच्या योगदानाची आणि व्यक्तिमत्वाची आठवण आठवण केली.
 

Maharashtra budget session 2026, 
शोकप्रस्तावात फडणवीस यांनी सांगितले की, “दादांचे बालपण त्यांच्या मामांच्या घराकडे गेले, जे कदम कुटुंबाशी संबंधित होते. त्यांच्या मामांचा संघटनाशी घनिष्ठ संबंध होता. त्यामुळे अजित दादांना कार्याची जाणीव बालपणापासूनच झाली.” त्यांनी अजित पवार यांच्या शैक्षणिक व कौशल्य विकासाच्या प्रवासाचे वर्णन करत, टोमॅटो लागवड आणि कुकुटपालनापासून त्यांनी आपला कारकिर्दीचा पाया मजबूत केला, असे सांगितले.फडणवीस म्हणाले की, “सहकार व शेती क्षेत्रात काम करून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला. जे अर्थसंकल्प ते सादर करीत, त्यामध्ये राजकोषीय स्थैर्य कायम ठेवण्यावर त्यांचा भर होता. खर्च नियंत्रण आणि महसूल वाढीसाठी त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होता. विकासासाठी त्यांचे प्राधान्य होते, पण राज्याच्या तिजोरीचे संरक्षण हे त्यांचे प्रथम कर्तव्य असे.”
 
 
माजी मुख्यमंत्री यांनी Maharashtra budget session 2026 अजित पवार यांचे भविष्यकाळाचे चित्रही मांडले. ते म्हणाले की, “मंत्री झाले नसते, तर अजित दादा पोलीस किंवा शेतकरी झाले असते. तसेच मला वाटले की ते बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट अभियंते झाले असते. सरकारी कामांच्या प्रत्येक तपशीलाकडे लक्ष देणे आणि त्याचा दर्जा सुनिश्चित करणे हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले असते.”फडणवीस यांनी या संदर्भात एक भावनिक क्षणही शेअर केला, की अजित पवार यांनी ज्या मेडिकल कॉलेजची वीट रचली होती, त्याच प्रांगणात त्यांचा मृतदेह ठेवावा लागला, हे दुर्दैवी व दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यांनी पुढे नमूद केले की कोणत्याही मुख्यमंत्र्यांना जर आदर्श अर्थमंत्री पाहिजे असेल, तर तो अजित पवारसारखा असावा, जो राज्याच्या तिजोरीचा वारसा सांभाळेल, पण विकासकामांना रोखणार नाही.
अधिवेशनाच्या सुरूवातीस झालेल्या या श्रद्धांजलीत पक्षीय नेते, माजी आणि विद्यमान मंत्र्यांपासून ते सामान्य सदस्यांपर्यंत सर्वांनी आपली श्रद्धांजली व्यक्त केली. या दिवशी विधानसभेतील वातावरण भावनिक व स्मरणीय झाले.अजित पवार यांच्या योगदानाचे आणि व्यक्तिमत्वाचे स्मरण करत, राज्याच्या राजकारणात त्यांनी केलेल्या कार्याचे व वित्तीय स्थैर्य राखण्याच्या प्रयत्नांचे फडणवीस यांनी अधिवेशनात विशेष कौतुक केले.