नागपूर,
Cloud Nine hosted क्लाऊड नाइन रसिकांसाठी सुरमयी शाम या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम घेऊन येत आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६, सायंकाळी ५.३० वाजता लक्ष्मी नगर, आठ रस्ता चौक, सायंटिफिक सभागृह येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमाची संकल्पना मेधा हरिदास, दीपाली पनके, मृदुल पुरोहित आणि शशिकांत वाघमारे यांनी रचली असून, श्याम बापटे सहसंयोजक आहेत. मार्गदर्शन प्रा. पद्मजा सिन्हा आणि मुकुल पांडे यांचे राहणार आहे, तर निवेदन प्रा. उज्ज्वला अंधारे करणार आहेत.
कार्यक्रमात प्रा. पद्मजा सिन्हा, मुकुल पांडे, रजनी ठाकरे, वैभव पुसदकर, संजय बोरकर, प्रसाद देशपांडे, गौरी बावडेकर, दीपक दुधमोगरे, हेमंत राऊत, प्रीती कुळकर्णी, अस्मिता शिवलकर, मुकुल नांदे, संजय वाघमारे, प्राजक्ता केळकर, सुनील दहिकर, रेखा पाटील आणि समृद्धी ठाकरे हे गायक कलाकार आपली कला सादर करतील. Cloud Nine hosted त्यांना महेंद्र ढोले आणि टीम साथ देतील. आयोजकांनी सांगितले की, हा कार्यक्रम नि:शुल्क असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र