दर्शनाच्या रांगेत धक्कादायक घटना; तिरुपती बालाजी मंदिरमध्ये भाविकेला चावला साप

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
तिरुमला.  
tirupati-balaji-temple आंध्र प्रदेशातील तिरुमला येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तिरुपती वेंकटेश्वर मंदिरात बालाजीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे असलेल्या एका भक्ताला साप चावला. आज सकाळी घडलेल्या या घटनेने तिरुमलामध्ये खळबळ उडाली आहे.

tirupati-balaji-temple 
 
तेलंगणातील भूपालपल्ली येथील भक्त मोनिका, तिरुमला श्रीवरीच्या दर्शनासाठी रांगेत उभी होती, तिला साप चावला. घटनेची माहिती मिळताच तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट (टीटीडी) चे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मोनिकाला अश्विनी रुग्णालयात नेले. tirupati-balaji-temple प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारांसाठी तिरुपती येथील स्विम्स रुग्णालयात हलवण्यात आले. महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टने मोनिकाच्या कुटुंबाला सर्पदंशाची माहिती दिली आहे. दरम्यान, टीटीडीचे वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. tirupati-balaji-temple भाविक ज्या रांगेत वाट पाहत आहेत त्या रांगा कर्मचारी कसून तपासत आहेत. टीटीडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाविकांना आश्वासन दिले आहे की भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी पावले उचलली जातील.