भाषा वाचवण्यासाठी दस्तावेजीकरण आवश्यक : कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
वर्धा,
vc prof kumud sharma वापरात घट झाल्यामुळे अनेक मातृभाषा लुप्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. अशा परिस्थितीत भाषांचे शास्त्रीय दस्तावेजीकरण करून त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू प्रा. कुमूद शर्मा यांनी केले. महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापिठात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त आयोजित परिसंवादात त्या बोलत होत्या. यावेळी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठ नवी दिल्ली येथील प्रा. सुधीर प्रताप सिंह, डॉ. कुश गणहोत्रा, भाषा विद्यापिठाचे अधिष्ठाता प्रा. अवधेश कुमार आणि भाषा विज्ञान विभागाचे अध्यक्ष डॉ. एच. ए. हुनगुंद उपस्थित होते.
 
 

kumud sharma 
 
 
कुलगुरू प्रा. शर्मा पुढे म्हणाल्या की, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेच्या जतन व संवर्धनाचा संकल्प करावा. भाषिक स्वाभिमान वाढवावा आणि ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाची भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा, असे त्या म्हणाल्या. प्रा. सुधीर प्रताप सिंह यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेला दिलेल्या महत्त्वाचा उल्लेख करताना बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा आहे. संस्कृतीचे जतन करण्यासाठी मातृभाषांचे संरक्षण आवश्यक असून भाषा वाचवण्यासाठी आंदोलन नव्हे तर त्या भाषेत सर्जनशील लेखन व निर्मिती गरजेची आहे, असे त्यांनी नमूद केले.vc prof kumud sharma डॉ. कुश गणहोत्रा यांनी विविध भाषा शिकणे व्यतींच्या मानसिक विकासासाठी लाभदायक असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रा. अवधेश कुमार यांनी केले. संचालन डॉ. आर. पी. यादव यांनी केले. आभार डॉ. एच. ए. हुनगुंद यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.