दक्षिण चीन समुद्रात ७.१ तीव्रतेचा भूकंप

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
बीजिंग,
earthquake hits South China Sea रविवारी मध्यरात्री दक्षिण चीन समुद्रात तीव्र भूकंपाची नोंद झाली. अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर मापन पद्धतीवर ७.१ इतकी होती. स्थानिक वेळेनुसार रात्री बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी हा धक्का बसला. भूकंपाचे केंद्र दक्षिण चीन समुद्रात असून ते मलेशियातील बोर्नियो बेटावरील साबा राज्यातील कोटा बेलुदच्या वायव्य दिशेला सुमारे पंचावन्न ते बासष्ट किलोमीटर अंतरावर होते.
 
 

earthquake hits South China Sea 
या भूकंपाचे सौम्य ते मध्यम स्वरूपाचे धक्के कोटा किनाबालु, कुदत तसेच साबा राज्यातील इतर भागांत जाणवले. सारावाक आणि सिंगापूरमधील काही परिसरांतही हलके कंप जाणवले. काही ठिकाणी घरातील वस्तू हलल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. अलीकडील काळात साबा परिसरात जाणवलेल्या भूकंपांमध्ये हा तुलनेने तीव्र मानला जात असला तरी त्याची मोठी खोली असल्याने व्यापक हानी टळली आहे.