दोन पुरुष एक महिलेचा समावेश
राळेगाव तालुक्यातील झरगड येथील घटना
राळेगाव,
Heavy rain तालुक्यातील झरगड येथे सोमवार, २३ फेब‘ुवारी रोजी दुपारी ३ च्या सुमारास वीज पडून पाच जण जखमी झाले. त्यांना यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. राळेगाव तालुक्यातील झरगड येथे शेतात वीज पडली. यात पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत रामचंद्र नारायण पचारे (४५), गणेश नान्हे (५०), पदिले (५५), सुनीता राऊत (३५), वंदना पदिले (४२, सर्व राहणार झरगड) हे जखमी झाले आहेत.
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक Heavy rain मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तेवढ्यात झरगड येथील रामचंद्र पचारे यांच्या शेतामध्ये हे मजूर काम करत होते. यानंतर पावसाला सुरुवात होताच ते एका झाडाखाली बसले होते. यावेळी अचानक मुसळधार पावसासह कडाडली आणि ती वीज अंगावर पडून पाच जण जखमी झाले. याची माहिती आजूबाजूच्या शेतकर्यांना कळताच तातडीने त्यांनी नातेवाईकांना बोलावून राळेगाव ग‘ामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेची स्थिती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच प्रशासनाकडूनही आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.