नागपुरात अवकाळी पावसाचा तडाखा; कळमना बाजारात धान्य भिजले

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
Heavy rains
 
 
नागपूर,
Heavy rains lashed Nagpur नागपूर पहाटे झालेल्या अवकाळी वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे शहरातील कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उघड्यावर ठेवलेली शेकडो धान्याची पोती भिजली. पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असतानाही धान्याची योग्य साठवण न केल्याने हे नुकसान झाल्याची चर्चा व्यापारी आणि शेतकरी वर्गात सुरू आहे. उघड्यावर पडून राहिलेल्या धान्याला पावसाचा तडाखा बसल्याने मोठ्या आर्थिक तोट्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हाल केले आहेत. महागाव तालुक्यातील कोंदरी आणि वाकण परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. शिवारात पिके आडवी झाल्याचे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी चिंतेत असून नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी होत आहे.