हिंदू सहिष्णू आहेत याचा वेगळा अर्थ काढू नका : पांडे

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
सिंदीत विशाल हिंदू संमेलन
 
सिंदी (रेल्वे), 
आपल्या देशात हिंदूंची संख्या भक्कम आहे. ते सहिष्णू आहेत. याचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. आमच्यासाठी भारतवर्ष सर्वोपरी आहे, असे परखड मत विहिंपचे अटलबिहारी पांडे यांनी व्यत केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशाल Hindu Samelan हिंदू संमेलन आणि हिंदू एकत्रिकरण कार्यक्रम रविवार २२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्टॅण्ड परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हभप शुभम गिरडकर (आळंदीकर) यांची उपस्थिती होती.
 
 
Hindu Samelan
 
व्यासपिठावर मातृशती प्रतिनिधी वर्षा बमनोटे, पवन गौड, महेश राऊत, बजरंग दल संयोजक अमोल अतकर, प्रशांत यादव, प्रखंड अध्यक्ष प्रा. मनोहर फूसे, दत्ता चव्हाण आदी उपस्थित होते. हभप शुभम गिरडकर यांनी राष्ट्रीय चेतना जागविणारे शिवाजी महाराजाची रणनीती आणि हिंदूच्या ऐयाबद्दल विस्तृत विवेचन केले. प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने विशाल Hindu Samelan  हिंदू संमेलनाची सांगता झाली. या सोहळ्याच्या प्रारंभी, जुन्या पोलिस स्टेशनपासून मिरवणूक काढली होती. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राणी कलोडे यांच्यासह नगरसेवक आणि स्त्री आणि पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.