नागपूर,
Avadhut Nagar सम्पूर्ण हिंदू समाजाच्या स्वजागरणासाठी आयोजित हिंदू सम्मेलन उत्साहात पार पडले. सकाळी लवकुश नगर येथून कलश यात्रा भगवे ध्वज आणि भजन-जयघोषासह सुरू झाली. काही मुलांनी शिवाजी महाराज आणि भारत माता अशा वेशभूषा करून यात्रेला शोभा वाढवली. यात्रा महाकाली नगर क्र. ३ हनुमान मंदिर येथे पोहोचली, जिथे कलश मंदिरात स्थापन करून गौमातेची पूजा करण्यात आली आणि हनुमान चालीसा चे पाच आवर्तन पार पडले.
कार्यक्रमात पूज्य संत भगिरथजी महाराज, सर्व मान्यवर आणि बालगोपाल उपस्थित होते. दीपप्रज्वलन, भारत माता पूजन, अभंग, स्तोत्र व गजानन महाराजांचा अध्याय वाचन पार पडले. Avadhut Nagar कार्यक्रमात विनोद कडू, श्वेता नानोटे, पूज्य भगिरथ महाराज आणि अमोल ठाकरे यांनी भाषण केले. समारोप भारत माता आरतीने झाला आणि सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
सौजन्य: मोल बोंदरे, संपर्क मित्र