विशाल हिंदू संमेलन

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Hindu gathering संघ शताब्दी निमित्त नरेंद्र नगर महालक्ष्मी वस्तीत विशाल हिंदू संमेलन संपन्न झाले. यामध्ये शिवजयंती निमित्त स्कूटर रॅली, सामूहिक स्तोत्रपठण, शालेय विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा, महिला रांगोळी स्पर्धा, तरुणांचे हॅकेथॉन, आणि शेवटी जाहीर सभा आयोजित करण्यात आली.
 
Hindu gathering
 
जाहीर सभेत मुकुलजी कानिटकर यांनी संघाच्या शंभर वर्षातील वाटचाल व व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माणाचे महत्त्व सांगितले. प्राध्यापक सुभाष लोहे यांनी सांगितले की, संघाच्या शिस्तबद्ध कार्यामुळे समाजाला आणि देशाला अपेक्षित योगदान देण्याची क्षमता वाढली आहे. परमपूज्य भगीरथजी महाराज यांचे आशीर्वचन उपस्थितांना प्रेरणादायी ठरले. Hindu gathering विविध स्पर्धेत भाग घेतल्यांनाही पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मंचावर डाॅ. जयरामजी कांमडी, संघचालक डाॅ. प्रसाद वरदडकर, सहसंयोजिका तेजी विसेन, आणि वैयक्तिक गीत सादर करणारे अतुल जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रोहिणी अलोणी यांनी केले, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आसावरी कोठीवान यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप कल्याणी पिदडी, दीपिका लेहगावकर व सिमा पिदडी यांच्या वंदे मातरम् गायनाने झाला. नंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
सौजन्य: आसावरी कोठीवान, संपर्क मित्र