मानवाला पुनर्जन्मासाठी सत्कार्याची जोड हवी : पुनर्जन्मी सुनीतादेवी

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
कारेंजा (घा.),
sunita devi पृथ्वीवर जन्म घेणारे सर्वच प्राणी हे पूर्वजन्माच्या बर्‍या वाईट कार्यामुळे व आपल्या अंतिम वासने नुसार जन्म घेतात. कुणी बदल्यासाठी तर कुणी उपकाराची परतफेड करण्यासाठी जन्म घेतात. पण, चांगला जन्म हवा असेल तर मानवाला पुनर्जन्मासाठी सत्कार्याची जोड असणे महत्त्वाचे असल्याचे मत पुनर्जन्मी सुनीता यांनी बेलगाव येथे व्यत केले.

सुनितादेवी  
 
 
याप्रसंगी माजी सभापती वर्धा नीता गजाम, चेतना मानमोडे, टिकाराम घागरे, टिकाराम चौधरी, शरद ढोबाळे, रमेशचंद्र सरोदे, विनोद टावरी, नरेंद्रजी वाघ, काशिनाथ गोंधळे, प्रमोद बुरंगे, गोदावरी आत्राम, सरपंच स्वप्निल खवशी, अ‍ॅड. आश्विनी कोहळे, कृष्णा हरले यांची प्रमुख उपस्थिती होती. आदिवासींच्या बेलगाव येथे अमेरिकेच्या व्हर्जिनिया विद्यापीठाचे शास्त्रज्ञ ईवान स्टीव्हंसन सारख्या शास्त्रज्ञांनी तसेच फ्रान्स, जर्मनीच्या संशोधकांनी प्रत्यक्ष येऊन पुनर्जन्मा संबंधी सर्व पुराव्यासह पुनर्जन्मी सुनीता प्रकरणी संशोधन सिद्ध केले.
 
बेलगाव हे आदिवासींचे गाव असले तरी येथे कसलीही अंधश्रद्धेचे किंवा बुवाबाजीचे थोतांड नसून पुनर्जन्मी सुनीता मुळे आदिवासींच्या जीवनात प्रगतीची सोनेरी पहाट उगवली आहे. महोत्सवात खा. अमर काळे, आ. दादाराव केचे, राष्ट्रीय वते अ‍ॅड. दिलीप कोहळे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रमेशचंद्र सरोदे यांनी केले.sunita devi गोपालकाल्याचे किर्तन रामकृष्ण महाराज आत्राम यांनी केले तर संचालन साक्षी सोनारे, मीना धुर्वे यांनी केले तर आभार अशोक धुर्वे यांनी मानले. याप्रसंगी सुनीता यांचे पूर्वजन्मीचे बंधू शेषराव काळमेघ, प्रमोद बुरंगे यांचा सत्कार करण्यात आला.