पंचपरिवर्तानातील सर्व सेवा आवश्यक
पुणे, 'Nari Tu Narayani' Parishad त्याग, पराक्रम आणि सेवा समाजघडणीसाठी आवश्यक आहे. महिलांमध्ये ऋजुता असते.त्यामुळे सेवेची प्रेरणा मुळातच त्यांच्या अंगी असते. संकल्प, सहृदयता, समय आणि सातत्य यांच्या आधारे स्त्रियांनी अनेक क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. समाजाच्या उत्थानासाठी पंचपरिवर्तानातील सर्व क्षेत्रात सेवा आवश्यक आहे. आपण कृतीतून सर्वत्र पोहोचुया असा संदेश डॉ. अनघा लवळेकर यांनी दिला.
राष्ट्र सेविका समिती आणि ज्ञानभारती यांच्या वतीने 'Nari Tu Narayani' Parishad नारी तू नारायणी परिषदेचे आयोजन कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी समारोप सत्रात त्या बोलत होत्या. जिजामाता स्मारक समिती आणि बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्र या परिषदेचे सह आयोजक राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत कार्यवाहिका शैलजा देशपांडे, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी, जिजामाता स्मारक समितीच्या अध्यक्ष आशा साने, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या युनिट हेड स्वाती रानडे, ज्ञान भारतीच्या प्रांत समन्वयक सुनिता पेंढारकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
'Nari Tu Narayani' Parishad कृती ते कर्तृत्व या सत्रात दोन महिला संशोधकांच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या. यामध्ये पोर्टेबल बायो-टॉयलेटच्या संशोधक आरती शास्त्री यांनी स्वच्छ भारत,पोर्टेबल बायो-टॉयलेटची गरज ओळखून समाजाच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. प्रत्येक घरात, सोसायटीत अशा उपकरणांची गरजही त्यांनी अधोरेखित केली. तर येणार्या संकटांवर मात करत स्वतःचे आणि समाजाचे संरक्षण करण्यासाठी फ्लड फोरकास्ट मॉडेलवर काम करणार्या डॉ. प्रज्ञा दीक्षित यांनी विविध उदाहरणे देत एआयच्या मदतीने विविध मॉडेलची माहिती यावेळी दिली. वैष्णवी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, स्वाती जोशी यांनी आभार मानले. प्राची पाठक यांनी म्हणलेल्या संपूर्ण वंदेमातरम् ने परिषदेचा समारोप झाला.
वेदकाळापासून स्त्री -पुरुष समान
‘नारी तू नारायणी’ या विषयावर डेक्कन कॉलेजच्या डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांचे बीजभाषण झाले. आजपासून सात हजार वर्षे मागे पाहिले तर वेदकाळापासून आपण स्त्री -पुरुष एक सारखे नाहीत पण समान आहोत हाच धागा सापडतो. वेदकालीन सर्व पातळीवरील महिलांना समान स्थान होते. त्या यज्ञ करत, सारथ्य करत,निर्णय घेत आणि त्याकाळी महिलांचे पुनर्विवाह झालेले सुद्धा आढळतात,असे त्यांनी सांगितले.