जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप राजकारणात 'भूकंप'

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Jitendra Awad दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर विविध नेत्यांकडून शंका आणि संशय व्यक्त होत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ब्लॅक बॉक्ससंदर्भात महत्वाची शंका उपस्थित केली आहे.
 

Jitendra Awad 
आव्हाड म्हणाले Jitendra Awad की, ब्लॅक बॉक्स विमानाच्या त्या भागात असतो आणि तो जसा असतो तसाच तिथे होता. "ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनलेला आहे, ते टायटॅनियम आहे. ११ हजार सेल्सिअसच्या आगीमध्येही त्याला काही होऊ शकत नाही. मग तो कसा जळाला?" असे आव्हाडांनी पत्रकारांशी बोलताना प्रश्न उपस्थित केला.आव्हाड म्हणाले की, "माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच की ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो. जेवढा चौकशीला उशीर करतील, जेवढी चौकशी लांबवतील, आणि जेवढ्या खोट्या नाट्य गोष्टी सांगतील, की ब्लॅक बॉक्स जळून गेला, तेवढ्या संशयाला वाव मिळण्यास जागा निर्माण होत आहे."
त्यांनी रोहित पवारांच्या Jitendra Awad मागण्यांमध्ये तथ्य असल्याचाही मुद्दा मांडला. आव्हाड म्हणाले, "यामुळे, रोहित पवार ज्या मागण्या करत आहेत, त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे. कंपनी कुणाची आहे? कंपनीत पैसे कुणाचे आहेत? ते विमान किती तास उडलं होतं? त्याला एवढे तास उडण्याची परवानगी होती का? डीजीसीए काही कव्हर करायला बघतंय का? डीजीसीएचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत? ही कंपनी कुठल्या पक्षाच्या अधिपत्याखाली चालते? हे सर्व प्रश्न आता समोर आले आहेत."दरम्यान, काल मुख्यमंत्री यांनी सांगितले की, अनेक जण शंका उपस्थित करत असले तरी, ठोस पुरावे असल्यास त्यावर चर्चा केली जाईल. यावर आव्हाड यांनी सांगितले, "ब्लॅक बॉक्स जळून गेला, ही माझी सर्वात मोठी शंका आहे. जगातल्या कुठल्याही अपघातात ब्लॅक बॉक्स जळून गेला, असे कधीही सांगितले गेलेले नाही. त्यामुळे, शंकेला चौकशीच्या माध्यमातून वाव मिळणार असेल, तर शंका निश्चितच उपस्थित होणार आहे."