विवाहित प्रेयसीवर लैंगिक अत्याचाराह मुलीशी अश्लील चाळे

- प्रियकराविरुद्ध बलात्कार आणि पाेक्साे दाखल

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
sexual assault विवाहित प्रेयसीला ब्लॅकमेल करीत वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानंतर प्रियकराची वाईट नजर तिच्या मुलीवर गेली. त्याने मुलीशीसुद्धा अश्लील चाळे करीत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन इमामवाडा पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन महिलेच्या प्रियकराला अटक केली.प्रीतम वानखेडे (34,टाटा कॅपिटल हाइट्स, मेडिकल चाैक) असे आराेपीचे नाव आहे.
 
 

sexual 
 
 
आराेपी प्रितम वानखेडे हा प्राॅपर्टी डीलर असून ताे प्लाॅट खरेदी विक्रीमध्ये सक्रिय आहे. तर पीडित महिला विवाहित असून तिला एक मुलगी आहे. तिचा पती दुबईमध्ये नाेकरी करताे. ती महिला मुलीसह राहत हाेती. तिला एक प्लाॅट विकत घ्यायचा हाेता. ती प्लाॅट खरेदी करण्याच्या निमित्ताने आराेपी प्रितमला भेटली. प्लाॅट खरेदी-विक्रीच्या साैद्यादरम्यान दाेघांमध्ये मैत्री झाली. कालांतराने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, आराेपी तरुणाने संबंधित महिलेला सांगितले की, त्याचे त्याच्या पत्नीशी सुद्धा वाद हाेत असतात. त्यामुळे, आपल्या पत्नीला घटस्फोट देणार आहे.sexual assault महिलेलाही मुलीसह स्विकारण्याचे आमिष दाखवून पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी प्राेत्साहन दिले. मार्च 2024 मध्ये आराेपी महिलेला टाटा कॅपिटल हाईट्समधील त्याच्या फफ्लॅटमध्ये घेऊन गेला आणि तिथे त्याने तिच्यासाेबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
मुलीशीही अश्लील चाळे
आराेपी प्रितमने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात फसवले आणि अनेक ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे त्याची वाईट नजर प्रेयसीच्या मुलीवर पडली. प्रेयसी घरात नसताना ताे महिलेच्या मुलीसाेबत सुद्धा अश्लील कृत्य करायला लागला.sexual assault महिलेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणल्यास तिला मारहाण देखील करायला लागला. यासंबंधी पीडिते महिलेने इमामवाडा पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी आराेपीविरुद्ध बलात्कार तसेच पाेक्साेअंतर्गत गुन्हा दाखल करून आराेपी वानखेडेला अटक केली.