विजेचा कडकडात अर्धा तासपर्यंत पावसाची हजेरी
अनेक वस्त्यांमध्ये झाडे पडली
मनिष नगरातील अंडरपासमध्ये पाणी साचले
नागपूर,
मध्यरात्री ढगाळ वातावरणानंतर पहाटेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे अनेक भागातील झाडे रस्त्यांवर पडली. Unseasonal rains पहाटे ३ ते साडेतीनच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने अनेक वस्त्यांमध्ये झाडे रस्त्यावर पडल्याच्या तक्रारी नागरिकांनी आहे. सोमवारी सकाळी मनपाकडे तक्रारी आल्यानंतर मनपाच्या पथकाने रस्त्यांवरील झाडे हटविण्याचे काम वेगाने पूर्ण करीत रस्ते मोकळे केले.
Unseasonal rains नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारच्या पहाटे जोरदार पाऊस झाला. नागपूर, गोंदिया आणि भंडारा परिसरात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकर्यांची चिंता वाढली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नागपूर शहरात रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. यावेळी वारेही वाहत होते. त्यामुळे काही भागांमध्ये झाडं उन्मळून पडली. तर नागपूरच्या मनिष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडगाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला.
भाजीपाला पिकांना फटका
Unseasonal rains नागपूर ग्रामीणमध्ये अनेक भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. वादळी वार्यात अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या चना, तुर, मुग, उडीद यासह कडधान्य आणि फुलोर्यावर आलेल्या भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर, उन्हाळी भात पिकाला हा पाऊस लाभदायक ठरणारा आहे. हवामान विभागाने २४ फेब्रुवारीला सुध्दा विजेच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे.