श्रीगणेश पंचायतन याग उत्साहात

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Vishwa Kesari Foundation विश्व केसरी फाऊंडेशनतर्फे नरेंद्रनगर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर येथे भक्तिभावपूर्ण आणि वेदशास्त्रसम्मत श्रीगणेश पंचायतन याग पार पडले. मुख्य यजमान म्हणून योगेश मेडसिंगे, मेडसिंगे, पंकज आद्य आणि आद्य सहभागी झाले. यागविधी भागवत कुळकर्णी, पुरुषोत्तम कुळकर्णी, अल्हाद वखरे, अनंत जोशी, संकेत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली गेली. स्थापना, पूजन, अभिषेक, हवन आणि आरतीसह सर्व विधी शांत आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
 
Vishwa Kesari Foundation
 
यागानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यासोबतच आरोग्य शिबिर, बोन डेन्सिटी, शुगर, बीपी आणि ईसीजी तपासणी आयोजित करण्यात आली, ज्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यागासाठी आवश्यक १५००–२००० मोदक संस्थेच्या मातृशक्तीने श्रद्धापूर्वक तयार केले. Vishwa Kesari Foundation कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण विश्वकेसरी टीम ने मेहनत घेतली.
सौजन्य: राधिका बागदेव, संपर्क मित्र