२४ अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त
वर्धा,
शहरातील Atikramaṇ haṭav mohim अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने हाती घेतली आहे. मंगळवार २४ गांधी पुतळा ते प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पुतळा, केसरीमल कन्या शाळा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. तर २४ अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त करण्यात आले. पालिकेच्या या कारवाईमुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले.
शहरातील मुख्य मार्गांवर वर्षानुवर्षांपासून सर्वत्र Atikramaṇ haṭav mohim अतिक्रमण बघायला मिळत आहे. यात रस्त्यापर्यंत हातगाड्या लावून फळ, भाजीपाला, खाद्यपदार्थ व अन्य वस्तूंची विक्री केली जाते. यातच ग्राहकांचीही गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. केसरीमल कन्या शाळा परिसरातील अतिक्रमण वारंवार काढल्यानंतरही व्यावसायिकांकडून पुन्हा रस्त्यावर व्यवसाय थाटून अतिक्रमण केले जाते. यामुळे मार्ग अरुंद होऊन रहदारीला नित्याने अडथळा होतो. सायंकाळनंतर दररोज वाहतुकीची कोंडी होते. या संदर्भातील तक्रारीनंतर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने महात्मा गांधी पुतळा ते इंदिरा गांधी पुतळा, केसरीमल कन्या शाळा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढले. ही मोहीम पुढे सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शहरातील अतिक्रमण वारंवार काढले जाते आणि व्यावसायिक पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करूनच व्यवसाय करतात. यामुळे आता नगरपालिकेने पथकाची निर्मिती करीत अतिक्रमणावर वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुन्हा अतिक्रमणाचा प्रयत्न झाल्यास जप्ती व दंडात्मक कारवाई होणार आहे. Atikramaṇ haṭav mohim अतिक्रमण हटाव मोहीम नगराध्यक्ष डॉ. सुधीर पांगुळ, मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.