पुलगावच्या जवानाची झारखंडमध्ये जांबाज कामगिरी

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
पथकाचे वाचवले प्राण
 
पुलगाव, 
झारखंड राज्यातील चाईबासा येथील सारंडा जंगलात २१ रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान आयईडी स्फोटात माऊली पार्क, पुलगाव येथील Cobra Commando Dinesh Raut कोब्रा कमांडो दिनेश राऊत जखमी झाले. या स्फोटात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली.
 

coman 
 
Cobra Commando Dinesh Raut जखमी अवस्थेत त्यांना जंगलातून हेलिकॉप्टरने रांची येथील राज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर २२ रोजी एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली; मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा डावा पाय कापावा लागल्याचे कळवण्यात आले. नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईदरम्यान त्यांनी अतुलनीय शौर्य आणि पराक्रम दाखवून स्वतःचा तसेच संपूर्ण पथकाचा जीव वाचवला. ते अत्यंत सामाजिक, धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व आहेत.