पुतळ्याच्या संरक्षण भिंतीला चारचाकीची धडक; युवक ठार

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
तिरोडा, 
शहरातील सहकार नगर परिसरातील रहिवासी किरण सुरजलाल पारधी (35) यांचा सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास accident at Sukali Naka सुकळी नाका येथे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे तिरोडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण पारधी हे त्यांच्या एमएच 35 एडब्ल्यू क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने कामानिमित्त बाहेर जाऊन घरी परतत होते. सुकळी नाका परिसरात पोहोचताच त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या संरक्षण भिंतीला जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, त्यात किरण पारधी यांचा जागीच मृत्यू झाला.
 
 
acc
 
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. किरण पारधी यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व लहान मुले असा परिवार आहे. या accident at Sukali Naka  दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.