VIDEO: रहिवाशांचा शूर कारनामा! चोराला रंगेहाथ पकडून जबरदस्त धुलाई

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
पिंपरी चिंचवड,
burglar-caught-red-handed : पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरात एका धाडसी घटनेत स्थानिक रहिवाशांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता एका सराईत घरफोड्याला रंगेहाथ पकडले. पकडलेला आरोपी जालना येथील असून, त्याचा दुसरा साथीदार पिस्तूलाचा धाक दाखवून पळून गेला.
 
 
PUNE
 
घरफोडीची घटना
 
सागर सिंग सुरत सिंग उर्फ फंटास्टिक बावरी अंधरेले (वय 27, गुरुगोविंदसिंगनगर, जालना) आणि त्याचा अज्ञात साथीदार भोसरी येथील एका फ्लॅटमध्ये घरफोडीसाठी आले. त्यांनी घराची कडी व लॅच तोडून बेडरूममध्ये प्रवेश केला. लोखंडी कपाटातील ड्रॉवर आणि लाकडी लॉकर उचकटवून त्यांनी रोख रक्कम आणि चांदीची नाणी चोरली. चोरी पूर्ण करून ते मोटारसायकलवरून पसार झाले.
 
 
 
 
 
 
रहिवाशांचा शूर कारनामा
 
मोटारसायकलवरून पळून जात असतानाच रहिवासी सचिन पिंगळे, चेतन वारुळे, ताज शेख, उमेश वाल्हे, सुधीर वाघ, जोतीराम भोसले, गोपाळ कुलकर्णी आणि बिल्डिंगच्या सिक्युरिटीसह ध्वजशेर शाही यांनी आरोपी सागर सिंगला पकडले. दुसरा आरोपी पिस्तूलाचा धाक दाखवून पळून गेला. या झटापटीत ध्वजशेर शाहीला हाताच्या बोटाला जखम झाली.
 
पोलीस तपास सुरु
 
सदर प्रकरण भोसरी पोलिस ठाण्यात नोंदवले असून, पोलीस पथक तपास करत आहे.