परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णवेळ कार्यान्वित ठेवा

बारावीचे दोन पेपर फुटल्यानंतर बोर्डाचा मोठा निर्णय

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
examination center बारावीच्या परीक्षेचे दोन पेपर फुटल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा बोर्डाने प्रत्येक परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णवेळ कार्यान्वित ठेवणे बंधनकारक केले आहे. फुटेजमध्ये काही गडबड किंवा छेडछाड आढळल्यास संबंधित केंद्र संचालकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्राचार्य, केंद्र प्रमुखांना दिला आहे.
 
 

pariksha 
 
 
बारावीच्या केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयांचा पेपर आधीच फुटल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर येथे नुकताच घडला आहे. त्यानंतर आता परीक्षा बोर्ड अँक्शन मोडवर आले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. तसेच हे सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळल्यात संबधित केंद्र प्रमुख, प्राचार्य, समन्वयक यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बोर्डाने दिला आहे. तसेच फुटेजमध्ये काही गडबड किंवा छेडछाड आढळल्यास संबंधित केंद्र संचालकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
 
सध्या राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवळ कॅमेरे लावून चालणार नाही, तर परीक्षा कालावधीत होणाºया सर्व घडामोडींचे सातत्याने आणि अखंडित रेकॉर्डिंग होणे अत्यावश्यक आहे, असे बोर्डाने परीक्षा केंद्र व शाळांना आदेश दिला आहे. अनेक परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळल्याने शिक्षण विभागाने याबाबत कडक धोरण अवलंबले आहे. कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
 
नागपूरमध्ये १८ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता. बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयांचे पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सेंट उसुर्ला गर्ल्स हायस्कूल या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला. ती विद्यार्थिनी वारंवार वॉशरूमला जात असल्यामुळे पर्यवेक्षकांना संशय आला. तिची तपासणी केली असता तिच्याकडे स्मार्ट फोन आढळला.examination center या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे आलेली होती. केवळ १८ फेब्रुवारीचा केमिस्ट्रीचाच नाही, तर १६ फेब्रुवारी रोजी झालेला फिजिक्सचा पेपरही अशाच प्रकारे व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित झाला असल्याचा तपासात आढळून आले. याप्रकरणी शिकवणी वर्गाचा संचालक निशिकांत मूनसह शिक्षक फरहान अशा दोघांना अटक करण्यात आली आ