८० दिवसांत सोनं पिकवलं! दोन एकर कलिंगडातून ९ लाखांचा नफा

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
सेलू, 
Cellu: Kalingad तालुयातील हिंगणी येथील प्रगतशील शेतकरी सुरज ठोंबरे यांनी आधुनिक शेतीतून यशाचा नवा आदर्श घालून दिला आहे. अवघ्या दोन एकर शेतात टरबूज (कलिंगड) लागवड करून त्यांनी फत ८० दिवसांत तब्बल ९ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. ठोंबरे यांच्या शेतातून एकरी २५ टन याप्रमाणे ५० टन उत्पादन निघाले. बाजारात प्रति टन २२ हजार ७५० रुपये भाव मिळाल्याने ११ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले. त्यातून २ लाख ५० हजार रुपये खर्च वजा जाता ९ लाख रुपयांचा निव्वळ नफा साध्य झाला. विशेष म्हणजे, अजूनही १५ टन माल शिल्लक असून त्यातून दीड लाखांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न अपेक्षित असल्याचे शेतकरी सुरज ठोंबरे यांनी सांगितले.
 
 
dksld
 
Cellu: Kalingad  या यशामागे राहुल शिंदे (कृषी मार्गदर्शक) आणि ठोंबरे अ‍ॅग्रो एजन्सी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. योग्य वाणाची निवड, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन आणि प्रभावी कीडनियंत्रण या चतुःसूत्रीचा काटेकोर वापर करण्यात आला. योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास केला तर शेतीतूनही मोठं उत्पन्न शय आहे, असा आत्मविश्वासपूर्ण संदेश सुरज ठोंबरे यांनी दिला.