नागपूर,
East Samarth Nagar Nagpur पूर्व समर्थ नगर येथे २२ फेब्रुवारी रोजी विराट हिंदू महासंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या निमित्ताने १८ व १९ फेब्रुवारी रोजी लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात वेशभूषा स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच स्लो सायकल स्पर्धांचा समावेश होता. स्पर्धांना बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त चुनाभट्टी ते प्रशांत नगर दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात परिसर दुमदुमून गेला. East Samarth Nagar Nagpur २१ फेब्रुवारी रोजी देशभक्तीपर मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला २२ फेब्रुवारी रोजी प्रभाग क्र. १६ मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत डॉ. दिलीपजी घोरपडे यांनी व्यक्त केले. स्वागताध्यक्ष परागजी सराफ होते. रामकृष्ण मठ, नागपूर येथील स्वामी ज्ञानगम्यानंदजी महाराज यांचे आशीर्वचन लाभले, तर डॉ. रेणुका जांभुळकर यांनी प्रभावी प्रवचन केले.कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून शेवटी उपस्थितांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
सौजन्य : मित्र सुरेश चव्हारे,संपर्क मित्र