हरयाणातील समलखा येथे होणार अ. भा. प्रतिनिधी सभा

-अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची माहिती

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
sunil-ambekar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी युगाब्द 5127, विक्रम संवत 2082, चैत्र कृष्ण दशमी (दोन दिवस), एकादशी म्हणजेच 13, 14 आणि 15 मार्च रोजी हरयाणातील समलखा येथे आयोजित केली आहे, अशी माहिती अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.
 
 
 
SUNIL AAMBEKAR
 
 
 
संघाच्या दृष्टिकोनातून ही सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संस्थेची बैठक आहे. ही वार्षिक बैठक यावर्षी समलखा येथील ग्राम विकास आणि सेवा साधना केंद्र, पट्टी कल्याण येथे आयोजित करण्यात आली आहे. या वर्षी संघ शताब्दी असल्याने विजयादशमी उत्सव, गृहसंपर्क, हिंदू संमेलन, युवा संमेलन, प्रमुख नागरिक चर्चासत्र, सामाजिक सलोखा बैठका इत्यादी कार्यक्रम आणि मोहिमांचा लेखाजोखा घेऊन अनुभवांवर बैठकीत विशेष चर्चा होईल. प्रतिनिधी सभेत मागील वर्षातील म्हणजे 2025-26 च्या संघाच्या कार्याचा आढावा घेतला जाईल आणि प्रांतांमध्ये केलेल्या विशेष कामांची माहिती दिली जाईल. या बैठकीत सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीवर चर्चा होईल आणि महत्त्वाच्या विषयांवर ठराव मंजूर केले जातील. संघ शाखांकडून हाती घेतलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या प्रयत्नांवर, विशेषतः पंच परिवर्तन प्रयत्नांवर चर्चा अपेक्षित आहे. संघ शिक्षा वर्ग आणि कार्यकर्ता विकास वर्गासह इतर प्रशिक्षण वर्गांच्या योजनांवर चर्चा केली जाईल आणि येत्या वर्षासाठी संघाची कार्ययोजना निश्चित केले जाईल.
 
 
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सह-सरकार्यवाह आणि इतर पदाधिकारी तसेच कार्यकारिणी सदस्य या बैठकीला उपस्थित राहतील. प्रामुख्याने निवडून आलेले प्रतिनिधी, राज्य आणि प्रदेश पातळीवरील प्रमुख पदाधिकारी आणि 1489 स्वयंसेवक या बैठकीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. संघाने प्रेरित 32 वेगेवेळ्या संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, सरचिटणीस आणि संघटन मंत्रीदेखील बैठकीत सहभागी होतील.