नरसाळा वस्तीतील विशाल हिंदू संमेलन यशस्वी

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Narsala settlement नरसाळा वस्तीतील सकल हिंदू समाजाने विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन केले. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या योगदानामुळे संमेलन अत्यंत यशस्वीपणे पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात पुरुषोत्तम थोटे कॉलेजजवळील हनुमान मंदिरात कांड सुरु करून झाली. त्यानंतर नरसाळा ग्रामपंचायत जवळील हनुमान मंदिरातून चार भजन मंडळींच्या सहभागाने शोभायात्रेची सुरुवात झाली आणि ती पुरुषोत्तम थोटे कॉलेजजवळील हनुमान मंदिरात सायंकाळी ४.३० वाजता संपुष्टात आली.
 
Narsala
 
गोपाळकास शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच गोसंवर्धन गतिविधीमध्ये रोहित साहू उपस्थित होते. गायत्री परिवारा तर्फे दिप यज्ञाचे आयोजन करण्यात आले. Narsala settlement संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि मंचासमोर शिवशक्ती आखाड्याचे स्केटिंग, लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा आणि विविध शस्त्रांचे आकर्षक प्रदर्शन पाहायला मिळाले.
 
मुख्य वक्ते विलास इंगोले यांनी उपस्थित हिंदू जनमानसाला समाजात आवश्यक पाच परिवर्तनांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता भारतमातेची आरती करून आणि महाप्रसाद वितरित करून करण्यात आली. या कार्यक्रमात अंदाजे ९०० ते १००० लोक उपस्थित होते. Narsala settlement सकल हिंदू समाज समितीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केलेल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना धन्यवाद दिला. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात पर्यावरणाची काळजी घेतली गेली; मंचावरील बॅनर कापडी बनवण्यात आले आणि महाप्रसादासाठी वापरलेल्या पत्रावळी नैसर्गिक पद्धतीने विघटन होणाऱ्या खऱ्या पानांच्या बनविल्या होत्या.
सौजन्य: अमोल बोंदरे, संपर्क मित्र