मुंबई,
january-installment-of-ladki-bahin-yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ च्या हप्त्याबाबत महिलांमध्ये प्रश्न निर्माण झाला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या महिन्यांचे हप्ते कधी येणार याची उत्सुकता वाढली होती. या दरम्यान, राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यास सुरुवात केली असून, अनेक लाभार्थी महिलांना हे अनपेक्षित आश्चर्य म्हणून मिळाले आहे.

योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारने पात्र महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केले होते. ऑक्टोबर २०२५ पासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली, परंतु सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे कठीण झाले. या कारणास्तव ई-केवायसी करण्याची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली. तांत्रिक अडचणी अजूनही पूर्णपणे दूर झाल्या नसल्या तरी, ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्यासाठी 'लाडकी बहीण' योजनेचा सन्मान निधी थेट खात्यात जमा केला जात आहे. जानेवारी महिन्यात महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यामुळे आचारसंहितेच्या काळात फक्त डिसेंबर महिन्याचा उरलेला हप्ता दिला गेला. त्यामुळे जानेवारीचा हप्ता प्रलंबित होता. january-installment-of-ladki-bahin-yojana आता फेब्रुवारी महिना संपत चालल्याने लाभार्थी महिलांमध्ये जानेवारी व फेब्रुवारी हप्त्याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ लागले आहेत, मात्र फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.