आ. कुणावार पाचव्यांदा विधानसभा तालिका अध्यक्षपदी

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
समुद्रपूर, 
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिंगणघाटचे MLA Sameer Kunawar आमदार समीर कुणावार यांची तालिका अध्यक्षपदी निवड केली. आ. कुणावार यांना ही जबाबदारी पाचव्यांदा सोपवण्यात आली आहे. याआधी वर्धेचे तत्कालीन आ. प्रमोद शेंडे यांना विधानसभा उपाध्यक्ष म्हणून विधान मंडळाचे कामकाज करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्ष हा बहुमान आ. कुणावार यांना मिळाला असून पहिल्यांदा नागपूर अधिवेशनात त्यांची तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी तालिका अध्यक्ष म्हणून काम करताना सत्रातील जास्तीत जास्त कामकाज त्यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.
 
 
sameer
 
विक्रमी सलग सात तास सभागृहाचे कामकाज चालविण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावावर आहे. त्या कामगिरी बद्दल विधानसभा अध्यक्षांनी सभागृहामध्ये आ. कुणावार यांचे कौतुक केले होते. त्याचप्रमाणे उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. MLA Sameer Kunawar आ. कुणावार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुचित्रा पवार व सहकारी आमदारांचे आभार मानले. आमदार कुणावार यांची पाचव्यांदा तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

जनतेच्या सेवेसाठी दिलेली संधी : आ. कुणावार
लोकशाही प्रक्रियेतील एक महत्त्वाची जबाबदारी आहे. या पदाचा मान राखणे, सभागृहातील कारभार शिस्तबद्धपणे पार पाडणे आणि सर्व पक्षांना समान न्याय देणे, ही माझी प्राथमिक भूमिका आहे. पण त्याहीपुढे जाऊन जनतेच्या हिताचा निर्णयच घेतला जाईल. विधानसभेतील प्रत्येक चर्चेचा केंद्रबिंदू जनतेची गरज असावी, असा आपला कटाक्ष आहे. कायदे, धोरणं, नियोजन, प्रस्ताव किंवा निर्णय, हे सर्व काही शेवटी सामान्य नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारे असायला हवेत. कारण ही सत्ता, ही व्यवस्था, हे सर्व अस्तित्वातच ते फक्त आणि फक्त जनतेसाठी निर्माण केले असून त्याचा पुर्णपणे फायदा हा जनतेला झाला पाहिजे असा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे, असे मत MLA Sameer Kunawar आ. कुणावार यांनी व्यत केले.