मोदी सरकारने सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
मुंबई, 
supriya-sule राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. या वेळी त्यांना सिंगापूर देशासोबत होणाऱ्या व्यापारी कराराबाबत चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी निवडण्यात आले आहे. याआधीही सुप्रिया सुळे यांना ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळात सहभाग देण्यात आला होता.
 
supriya-sule
 
संसदेत दमदार कामगिरी करणाऱ्या संसद रत्न खासदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिया सुळे यांना परदेशात व्यापार करारावर चर्चा करणाऱ्या संसदीय मैत्री समितीत महाराष्ट्रातून विरोधी गटातून संधी मिळाली आहे. याआधीही त्यांचा सहभाग महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि संसदीय समित्यांमध्ये राहिला आहे. supriya-sule सुप्रिया सुळे यांनी माहिती तंत्रज्ञान, गृह व्यवहार आणि परराष्ट्र व्यवहार यांसारख्या स्थायी समित्यांवर काम केले असून वेगवेगळ्या देशांशी संबंध सुधारण्यासाठी आणि धोरणात्मक चर्चेसाठी स्थापन होणाऱ्या संसदीय मैत्री गटांमध्ये त्यांचा नियमित सहभाग राहतो. यामुळे केंद्र सरकारने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.