जमीन व्यवहार प्रकरणात पवारांचे नातेवाईक अडचणीत!

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
पुणे,
Pawar's relatives in trouble पुण्यातील मुंढवा परिसरातील गाजलेल्या जमीन व्यवहार प्रकरणात नवे वळण आले आहे. या प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटील यांनी पुणे सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे पोलिसांकडून पुढील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिग्विजय पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असून पार्थ पवार यांचे चुलत भाऊ आहेत.
 
 

Pawar 
 
गुन्हा नोंद झाल्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आरोपपत्र सादर झाल्यानंतर काही नव्या कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे पुन्हा अर्ज करण्याचा निर्णय घेत त्यांनी पूर्वीचा अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. कायदे तज्ज्ञांच्या मते, न्यायालयातून अनुकूल दिलासा मिळवण्यासाठी ही धोरणात्मक भूमिका असू शकते. तथापि, अर्ज मागे घेतल्यामुळे पोलिसांना अटकेची कारवाई करण्यास अडथळा राहिलेला नाही.
 
दरम्यान, या प्रकरणात पार्थ पवार यांना तपास समितीकडून दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या विकास खारगे समितीच्या चौकशीत जमीन खरेदीसंदर्भातील कागदपत्रांवर पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या व्यवहारात त्यांचा थेट सहभाग नसल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पुढील घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.