'यापुढे माझी तक्रार केली तर...' कंपनीच्या व्हाट्सअप ग्रुपवर फोटो शेअर केला, आणि...

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
राजगुरुनगर,
pune-crime-news : राजगुरुनगर (ता. खेड) येथील एका कंपनीत धक्कादायक घटना समोर आली. कंपनीच्या व्हाट्सअप ग्रुपवर फोटो शेअर केल्याच्या कारणावरून एका कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. खेड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
 
 
PUNE
 
जखमी कर्मचाऱ्याचे नाव विशाल हिरामण तोत्रे (मूळ रा. वडगाव पाटोळे, सध्या रा. राक्षेवाडी, ता. खेड) आहे. आरोपी अक्षय भगवान भांबुरे (रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, कंपनीत मोबाईल फोन वापरावरून वाद निर्माण झाला होता. विशाल तोत्रे यांनी आरोपीचा फोटो कंपनीच्या एचआर मॅनेजरकडे तसेच कंपनीच्या व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केला. संतप्त झालेल्या आरोपीने त्यांना अडवून लोखंडी रॉडने डोक्यावर आणि हाताच्या कोपरावर वार केले. या हल्ल्यात तोत्रे गंभीर जखमी झाले असून उपचार सुरू आहेत.
 
हल्ल्यानंतर आरोपीने धमकावत सांगितले, "यापुढे माझी तक्रार केली तर तुला ठार मारेन." या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस तपास करत आहेत.