सामाजिक समरसतेतून एकात्मता साधा : राजेंद्र ताजने

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
पुलगाव, 
हिंदू समाजाला सामाजिक समरसतेतून एकत्र येऊन हिंदू धर्मासाठी कार्य करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवरायांनी माता जिजाऊच्या संस्कारातून मातुशतीचा आदर करण्याचे शिकवले. शिवचरित्राच्या माध्यमातून पंचपरिवर्तनाने, सामाजिक समरसतेच्या माध्यमातून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने समरस हिंदू, समर्थ भारत निर्माण करण्याचा संकल्प करू या असे आवाहन प्रसिद्ध शिव चरित्रकार, युवा व्याख्याते Rajendra Tajne राजेंद्र ताजने यांनी केले.
 
 
tajane
 
Rajendra Tajne  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त स्थानिक संत गजानन मंदिर हाऊसिंग बोर्ड कॉलोनी येथे रविवार २२ रोजी आयोजित विशाल हिंदू संमेलनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पोलिस उपनिरीक्षक संदीप एकबोटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पंजाबी गुरुद्वारा पुलगावचे ग्यानी मानसिंग, विभाग कार्यकारणी सदस्य सचिन मुळे, भागवताचार्य विनोद महाराज जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. वैयक्तिक गीत कल्याणी भांडे हिने गायिले. सूत्रसंचालन अपूर्वा पांडे, आभार प्रदर्शन गौरव पिंपळकर यांनी केले.