सख्ख्या भावाकडून बहिण पाच महिन्यांची गराेदर

- भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
rape case जिल्ह्यातील एका खेडेगावात बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने सामाजिक वतूर्ळात खळबळ उडाली आहे. सख्ख्या भावाने बहिणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नव्हे तर ती बहिण तब्बल पाच महिन्यांची गर्भवती आहे. हा प्रकार उघडकीस येताच पाेलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
 

बलात्कार प्रकरण  
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी असलेले दाम्पत्यांना 17 वर्षांचा मुलगा आणि 15 वर्षांची मुलगी आहे. पती-पत्नी राेज सकाळी शेतात कामाला जातात आणि सायंकाळी घरी येतात. यादरम्यान, शिक्षण घेत असलेले दाेघेही बहिण-भाऊ घरी राहतात. त्या मुलाला स्मार्टफोनमध्ये अश्लील चित्रिफती बघण्याची सवय आहे. त्याच्या माेबाईलमधील चित्रिफती त्याच्या बहिणी दिसल्या. आईवडिलांना चित्रिफतीबाबत माहिती हाेऊ नये म्हणून त्याने बहिणीला चाॅकलेट, आईसस्क्रीम, पिझ्झा आणि ड्रेस घेऊन देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे तिने याबाबत वाच्यात केली नाही. मात्र, याचा विपरित परिणाम झाला. ताे घरात बहिणीसमाेरच बिनधास्त चित्रिफती बघायला लागला. यादरम्यान, त्याने बहिणीलाही चित्रिफती दाखवल्या. यानंतर दाेघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासल्यानंतर दाेघांमध्ये नियमित शारीरिक संबंध निर्माण झाले. गेल्या पाच महिन्यांपूर्वी बहिण गर्भवती झाली. मात्र, ही बाब कुणाला सांगावी, याबाबत दाेघेही संभ्रमात हाेते. शेवटी दाेघांनीही ही बाब लपवली. यादरम्यान, त्यांचे संबंध कायम हाेते.
 
डाॅक्टरांकडून फुटले बींग
तब्बल पाच महिन्यांची गराेदर असलेल्या मुलीने पाेट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. त्यामुळे आईने तिला डाॅक्टरकडे नेले. डाॅक्टरांना तपासणी करुन मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे आईच्या पायाखालची माती सरकली. आईने तिच्या कानाखाली आवाज काढून मुलाचे नाव विचारले. तिने भावाचे नाव सांगताच आईने कपाळाला हात मारुन घेतला.
गावात कुणकुण आणि पाेलिसांत तक्रार
पाेलिसांनी या घटनेला दुजाेरा देताना सगळा प्रकार कुटुंबातीलच असल्याने मान्य केले. समाजात बदनामी हाेईल, या भितीने मुलीच्या आई- वडिलांनी झालेल्या प्रकाराबाबत गुप्तता पाळण्याचा विनंती अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरण सार्वजनिक झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी केलेल्या अर्जातून दिला आहे.rape case मात्र बहिण-भावाच्या नात्याला तडा देणारा हा गंभीर प्रकार घडल्याने ग्रामीण पाेलिसही चक्रावले आहेत. पाेलिसांनी दखल घेत पाेक्साे अंतर्गत प्रकरण दाखल केले.
..........