सेवांकूरच्या डॉक्टरांचा देशासाठी एक आठवडा; वर्धेत स्वागत

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
रेल्वे स्थानकावर भारत माता की जयचा निनाद
 
वर्धा, 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिकवलेल्या सेवाभावातून सेवांकूर या वैद्यकीय चळवळीसोबत जुळून असलेल्या पण वैद्यकीय शिक्षण घेत असलेले पश्चिम महाराष्ट्र, पुणे आणि मुंबई येथील प्रशिक्षणार्थी आदिवासी भागात सेवा देण्यासाठी रवाना झाले. आझाद हिंद एसप्रेसने आज २४ रोजी वर्धा येथे पोहोचल्यानंतर रेल्वे स्थानकावर सेवांकुर भारतच्या चमुचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारत माता की जयचा जय घोष करण्यात आला.
 
 
seva
 
Sevankur Bharat सेवांकूर भारत या वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव जागवणार्‍या संस्थेच्या ‘एक सप्ताह देश के नाम’ या प्रेरणादायी उपक्रमाला यंदा उत्साहात सुरुवात झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजसेवा आणि राष्ट्रसेवेची सुंदर सांगड घालणारा ठरत आहे. पुणे येथून या सेवायात्रेला प्रारंभ झाला असून या मोहिमेत २० टके डॉटर आणि ७० टके एमबीबीएसचे प्रशिक्षण घेतलेले तब्बल ३०० वैद्यकीय विद्यार्थी व डॉटर्सची टीम रांची, झारखंड येथील वनवासी आणि दुर्गम भागात जाऊन आरोग्यसेवा देणार आहे. त्यात आरोग्य तपासणी, उपचार, जनजागृती आणि स्वच्छता मोहिमांद्वारे गरजूंपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पुणे येथुन निघालेल्या या सेवाभावी डॉटरांचे प्रमुख उपक्रमाचे प्रमुख डॉ. आनंद बोरिवाले, सहप्रमुख डॉ. सारंग माळी आणि डॉ. परी पाटील यांचे वर्धा रेल्वे स्थानकावर नगर संघ चालक डॉ. प्रसाद देशमुख, तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल व्यास, वर्धा नागरी बँकेचे माजी अध्यक्ष केशव दांडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच शुभेच्छा दिल्या.
 
 
Sevankur Bharat  ११ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या अभिनव सेवेच्या प्रवासात आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून अनेकांच्या आयुष्यात या अनुभवाने सामाजिक बांधिलकीची नवी जाणीव निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, नैतिकता, राष्ट्रीय चारित्र्य आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात; त्यातीलच हा एक महत्त्वाचा आणि हृदयस्पर्शी उपक्रम आहे, असे संयोजक डॉ. नितीन गादेवाड आणि बौद्धिक प्रमुख डॉ. यतिंद्र अष्टपुत्रे यांनी सांगितले.
 
 
दरम्यान, वर्धा येथे या सेवापथकाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करून कृतज्ञतेची भावना व्यत केली. समाजासाठी पुढाकार घेणार्‍या या तरुण वैद्यकीय सेवादूतांमुळेSevankur Bharat  ‘सेवा हीच खरी देशभक्ती’ या भावनेचा प्रत्यय आला. हा उपक्रम केवळ वैद्यकीय सेवा नसून राष्ट्रनिर्मितीचा एक सशत संस्कार असल्याचे मत नगर संघ चालक डॉ. प्रसाद देशमुख यांनी व्यत केले. यावेळी सावंगी आयुर्वेदिक कॉलेजचे वैद्य आणि सेवांकूरचे सदस्य सुमंत पांडे, कृष्णा कासोदेकर, विपुल सुराणा, अविनाश भोपे, डॉ. प्रकाश हनुमंते, सुभाष पेशकर, आशिष येरवंडे, प्रज्ञा हनुमंते, शुभांगी दांडेकर, अतुल चांदोरे, आदींची उपस्थिती होती. आदिवासी क्षेत्रात सेवांकुरचे कार्यकर्ते सेवा देत असल्याने रेल्वे प्रशासनाचे पोलिस अधिकारी पुर्णवेळ उपस्थित होते.