शरद पवारांच्या छातीत इन्फेक्शन!

उद्या होणार रुग्णालयातून डिस्चार्ज

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
पुणे,
Sharad Pawar has chest infection खासदार शरद पवार यांची तब्येत आता पूर्णपणे सुधारली असून डॉक्टरांच्या माहितीनुसार, उद्या (ता. २५) त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डॉक्टरांनी अधिकृतपणे सांगितले की, छातीत इन्फेक्शन झाल्यानंतर पवार यांच्यावर योग्य उपचार केले गेले आहेत आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे.
 
 

sharad pawar 
रुबी हॉस्पिटलचे डॉ. परवेझ ग्रँड यांनी सांगितले, शरद पवार यांची तब्येत पूर्णपणे सुधारली आहे. उद्या सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा प्रवास करू शकतील. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर आणि काही माध्यमांत अफवा पसरल्या होत्या. यावर डॉक्टरांनी स्पष्टपणे खुलासा करून त्यांच्या समर्थकांना दिलासा दिला आहे. डिस्चार्जनंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पवार यांचा सार्वजनिक कार्यक्रमात परत येण्याची शक्यता आहे.