आता मुलाने वडिलांची हत्या करत ड्रममध्ये ठेवले तुकडे!

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
लखनऊ,
Son kills father lakhanou उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एका थरारक खून प्रकरणाने शहर हादरले आहे. आशियाना परिसरात एका व्यापाऱ्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये तुकडे केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. मानवेंद्र प्रताप सिंह हे २० फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. तपासादरम्यान संशय त्यांच्या मुलगा अक्षय प्रताप सिंह याच्यावर गेला आणि अखेरीस त्यानेच वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली.
 
 


Son kills father lakhanou 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील मुलाला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास प्रवृत्त करत होते. याच कारणावरून पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात अक्षयने वडिलांवर गोळी झाडून त्यांचा जीव घेतला. घटनेनंतर पुरावे लपवण्यासाठी त्याने मृतदेह घरातील तळमजल्यावरील एका खोलीत ठेवला. नंतर त्याचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये लपवले. काही अवयव वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
 
पोलिसांनी घराची झडती घेतली असता ड्रममध्ये मृतदेहाचे काही भाग आढळले. हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले. आरोपीची आई यापूर्वीच वारली होती. घटनेच्या वेळी घरात आरोपीची बहीण उपस्थित होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.