एसटी बस व कारचा भीषण अपघात

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
एक ठार, सहा जखमी
अंजनगाव - आकोट रोडवरची घटना
 
अंजनगाव सुर्जी,
ST bus and car accident अंजनगाव आकोट रोडवरील भंडाराज रोडवर २४ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान एसटी बस व कारचा समोरासमोर अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला असून सहा गंभीर जखमी झाले आहे. एसटी महामंडळाची एमएच २० जीसी ३९३२ क्रमांकाची बस आकोटकडे जात असताना समोरून भरधाव आलेल्या एमएच २७ जीई ८०८१ क्रमांकाच्या कारसोबत समोरासमोर टक्कर होऊन यामध्ये कारचालक शालिग्राम वानरे (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला. या कारमधील नुकतेच लग्न झालेले प्रथमेश वानरे (वय ३०), उत्कर्षा वानरे - कडू (वय २७) जखमी झाले असून त्याच कारमधील कुसुम वानरे (वय ६०), रुखमाबाई गवई (वय ७०) सर्व राहणार अकोट हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना अंजनगाव ग्रामीण रुग्णालयातून उपजिल्हा रुग्णालया अचलपूर येथे पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे. परिवहन महामंडळाच्या बसमधील वंदना पिंपळकर (वय ३५), रमेश रामचंद्र पिंपळकर (वय ७०) रा. अचलपूर हे सुद्धा गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
 
 
acdsd
 
ST bus and car accident  अपघाताची भीषणता एवढी प्रचंड होती की कारच्या समोरचा भाग व एसटी बसचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. भंडारज रोडवर हा भीषण अपघात घडताच या गावातील ग्रामस्थ मदत करण्यासाठी धावून आले. त्यांनी तातडीने गंभीर जखमींना अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी तातडीने जखमी रुग्णांवर उपचार सुरू केले. अंजनगाव - आकोट या राष्ट्रीय महामार्गावर भंडाराज जवळील एका पुलासमोरील रस्ता दबल्यामुळे भरधाव असलेल्या वाहनांचे नियंत्रण सुटते व नेहमी अपघात होत असून या मार्गाची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पाहणी होणे गरजेचे आहे.