वर्धा,
Wardha : Unseasonal rain विदर्भात दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. सोमवारी पहाटेच्या सुमारास वर्धेत तर ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसासह गारपीट झाली होती. यातच मंगळवारी सायंकाळी ६.२० वाजताच्या सुमारास वर्धेत वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
Wardha : Unseasonal rain अचानक वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसामुळे लहान व्यापार्यांची मोठी तारांबळ उडाली. सध्या शेतात चणा, गहू यासारखी पीक आहेत. हे पीक काढणीला आले असून अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शयता आहे. सोमवारी अल्लीपूर, हिंगणघाट तसेच परिसरातील अन्य गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अल्लीपूर आणि काही गावांमध्ये गारपीटही झाले. आज मंगळवारी सायंकाळी ६.२० वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी वातावरणात उष्णतामान दिसून येत असतानाच अवकाळीने पुन्हा गारवा निर्माण केला आहे.