साखरा ते आगरवाडी रस्त्यासाठी ‘शोले स्टाईल’ आंदोलन

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
रिसोड्र 
साखरा फाटा ते आगरवाडी पर्यंतच्या रस्त्याच्या दैयनीय अवस्थेला कंटाळून २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आगरवाडी व परिसरातील नागरिकांनी water tank : Andolan  पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जाधव यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन लिखित स्वरूपात आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
 
 
andolan
 
विदर्भ मराठवाडाला जोडणारा सदर रस्ता गेली दोन दशकापासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. साखरा फाटा ते आगरवाडी पर्यंतच्या दोन किलोमीटर रस्त्याची चाळणी झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पडून अनेकांना दुखापत झालेली आहे. अनेक वेळा मागणी करून, आंदोलन करून शासन प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांनी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. मागणी जर पूर्ण झाली नाही तर येत्या १ मेला महाराष्ट्र दिनी पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
 
 
सदर water tank : Andolan  आंदोलनामध्ये अर्चना सचिन गांजरे, पांडुरंग वायभासे, सचिन इप्पर, सचिन गांजरे, भागेश मुंढे, संतोष मुंढे, कैलास मुंढे, गोपाल वायभासे तसेच आगरवाडी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर आंदोलनस्थळी ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वात सपोनि संतोष आघाव, पोलिस उपनिरीक्षक कदीर खान, पो.कॉ.प्रशांत राजगुरू, पो.कॉ राजेश गांगवे यांच्यासह पोलिसांचा ताफा उपस्थित होता. शेकडोच्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवत शासना प्रशासना विरोधात घोषणा दिल्या.