पुणे,
Army Institute of Technology Pune लष्करी अधिकारी आणि जवानांच्या उच्च शिक्षणात नवा अध्याय सुरू झाला आहे. पुण्यातील ‘Army Institute of Technology’ (एआयटी) ला स्वायत्त शैक्षणिक दर्जा मिळाल्याने आता महाविद्यालयात एम.टेक आणि पीएच.डी. अभ्यासक्रमही सुरु करण्यात आले आहेत. ही पावले विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधी वाढविण्यासोबत संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रात नवे मार्ग उघडण्यास कारणीभूत ठरणार आहेत.
१९९४ साली लष्करी Army Institute of Technology Pune अधिकारी आणि जवानांच्या पाल्यांसाठी स्थापन झालेल्या एआयटीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नता आहे. ‘आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी’ (एडब्ल्यूईएस) अंतर्गत देशभरातील १२ महाविद्यालयांमध्ये स्वायत्त दर्जा मिळवणारे एआयटी हे पहिले महाविद्यालय ठरले आहे. स्वायत्ततेमुळे आता महाविद्यालयाला अभ्यासक्रमात बदल करण्यास, नवीन अभ्यासक्रम तयार करण्यास तसेच तांत्रिक संशोधनासोबत उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार पाठ्यक्रमांचे पुनर्रचना करण्यास संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे.बीटेक अभ्यासक्रमाच्या पाच शाखांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवून वार्षिक ४८० पर्यंत पोहोचविण्यात आली आहे. एम.टेक व पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे उच्च तंत्रज्ञानातील शिक्षण आणि संशोधनासाठी विद्यार्थ्यांसाठी मार्ग खुला झाला आहे. यामुळे शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रकल्प, संशोधन उपक्रम आणि प्रगत शिक्षणासाठीची संधी अधिक सुलभ होणार आहे, असे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
स्वायत्ततेमुळे एआयटी Army Institute of Technology Pune आता कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, क्वांटम कम्प्युटिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम राबवू शकणार आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा, प्रयोगशाळा व संशोधन सुविधा वाढविणे आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग सुनिश्चित करणे याकडे महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष आहे.याव्यतिरिक्त, भारतीय नौदल आणि वायुसेनेच्या जवानांच्या पाल्यांसाठीही प्रवेश सुरू झाला असून, त्यांच्या पाल्यांसाठी १० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे लष्करी कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च तंत्रज्ञानातील शिक्षण घेण्याची संधी अधिक विस्तृत झाली आहे.शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात ही पावले महत्त्वाची मानली जात आहेत. विद्यार्थ्यांना बदलत्या औद्योगिक गरजांसाठी सज्ज होण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने एआयटीचा दर्जा व विद्यार्थ्यांवरील प्रभाव अधिक दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.