७ हजाराची लाच स्विकारताना महसूल सहाय्यकास अटक

*वर्धा लाचलुचपत विभागाची कारवाई

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
वर्धा, 
bribe-case : वादग्रस्त शेतजमिनीच्या प्रकरणातील गैरअर्जदारांना नोटीस तसेच तक्रारदाराच्या बाजूने आदेश पारित करण्याकरिता मागितलेल्या लाच प्रकरणी समुद्रपूर तहसील कार्यालयातील महसूल सेवकाला वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई बुधवार २५ रोजी समुद्रपूर तहसील कार्यालयात करण्यात आली. विद्या लोखंडे (५०) असे अटक करण्यात आलेल्या महसूल सहाय्यकाचे नाव आहे.
 
 
 
j
 
 
 
समुद्रपूर तालुयातील लोणार येथील शेत सर्वे ८७ आराजी २ हेटर आर हे शेत तक्रारदारांचे भासरे यांनी परस्पर नागपूर येथील रामटेके यांना विकल्याची माहिती मिळताच तक्रारदाराने शेतजमिनीचा फेरफार रोखण्याकरिता तहसील कार्यालयात आक्षेप नोंदविण्याकरिता अर्ज दिला होता. सदर अर्जावर तक्रारदाराने तहसीलदार यांना त्यांचे वकीलामार्फत आपले म्हणणे सादर केले होते. तक्रादाराच्या वादग्रस्त शेतजमिनीच्या प्रकरणातील संबंधित व्यतींना नोटीस तसेच तक्रारदार यांना त्यांच्या बाजूने आदेश पारित करण्याकरिता महसूल सहाय्यक विद्या लोखंडे यांनी १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ७ हजारावर शिकामोर्तब झाले. मात्र, तक्रारदार महिलेला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २३ रोजी वर्धा येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार २५ रोजी तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला आणि महसूल सेवकाला लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
 
 
ही कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक दिगांबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात वर्धा लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक राकेश साखरकर, सापळा अधिकारी कान्होपात्रा बन्सा, पोलिस निरीक्षक संदीप मुपडे, मंगेश गंधे, पंकज डाहाके, सचिन गाढवे, राखी फुलमाळी, प्रशांत मानमोडे, मनीष मसराम, प्रितम इंगळे, लक्ष्मण केंद्रे, विष्णू काळुसे, विनोद धोंगडे, अश्विनी भानखेडे, गणेश मेश्राम यांनी केली.