दर्यापुरात लाच लुचपत विभागाची धडक कारवाई

ग्रामसेवकासह दोन जण अटकेत

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
दर्यापूर, 
daryapur-anti-corruption-department : ग्रामपंचायत कान्होली येथील विकास कामाचे बिल काढण्यासाठी मागितलेल्या लाच प्रकरणात येथील ग्रामसेवकासह दोन जण लाच विभागाच्या सपळ्यात अडकले असून एकूण तीन जणांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
 
 
F
 
लाच लुचपत प्रतिबंध विभागाला तक्रार प्राप्त झाली की, ग्रा. प. कान्होली अंतर्गत जनसुविधा २०२४-२०२५ या लेखाशिर्षा अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्ता बांधकामाचे काम घेतले होते. सदर काम हे पूर्ण झाले असून त्या कामाचे एकूण ८ लाख रुपये बिलापैकी ३ लाख ८० हजार रुपये हे तक्रारदार यांना प्राप्त आहे. उर्वरीत बिल ४ लाख २० हजार रुपये बाकी असल्याने सदर बिल काढून देण्याकरीता गोपाल देविदास चारथळ (ग्रामविकास अधिकारी ग्रा. पं. कान्होली), पद्माकर साहेबराव राऊत ( ग्रा.पं. सदस्य), मोतीराम गोंडुजी कोल्हे (खाजगी व्यक्ती) यांनी तक्रारदार यांना ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर तक्रारीवरून लाच प्रतिबंध विभागाने पडताळणी केली असता, उर्वरीत बिल काढून देण्याकरीता तडजोडीअंती ३० हजार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान ३० हजार लाचेची रक्कम पद्माकर राऊत व मोतीराम कोल्हे यांनी लक्ष्मी झेरॉक्स सेंटर जवळ स्विकारले. या प्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलिस उपअधीक्षक सुनील किनगे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. सिवा मेसरे, पो. नि. ज्ञानोबा फड, प्रमोद रायपुरे, शैलेश कडू, वैभव जायले, बंदना खंडारे, सतीश किटूकले, राजेश बहिरट यांनी केली.