अनिल कांबळे
नागपूर,
death-by-drowning-in-a-water-tank : दाेन वर्षांचा चिमुकला घराशेजारी खेळता खेळता जमीनीलगत असलेल्या पाण्याच्या टाक्यात पडला. त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कळमना हद्दीत मिनीमातानगर येथे उघडकीस आली. कुश राजेंद्र पटेल असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी पाण्याची टाकी निर्माण करणाèया व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी कुश हा शेजारी राहणाèया लहान मुलांसाेबत अंगणात खेळत हाेता. कुशच्या घरासमाेरच गुड्डू उफर् इमामुद्दीन माे. अहरुद्दीन शहा (42) यांचे घर आहे. गुड्डूने घराच्या जिन्याखाली नळाचे कनेक्शन घेतले आहे. मात्र, नळाला पाणी येत नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी नळाजवळच खड्डा खाेदून टाके तयार केले हाेते. त्या टाक्यात पाणी जमा करून ते वरच्या माळ्यावर पाईपच्या मदतीने नेत हाेता. खेळता खेळात कुश त्या पाण्याच्या टाक्यात पडला. परंतु, हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही.
बराच वेळ झाला तरी कुश कुठेही दिसून येत नसल्याने त्याचा शाेध घेण्यात आला. पाण्याच्या टाकीत ताे पडला असता तेथे ताे बेशुद्धावस्थेत मिळून आला. बाहेर काढून त्याला जवळच असलेल्या डाॅक्टरकडे नेले. त्यानंतर त्याला खाजगी दवाखान्यात नेले असता डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषित केले. याप्रकरणी कळमना पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. या प्रकरणी कुशचे वडिल राजेंद्र पटेल यांच्या तक्रारीवरुन कळमना पाेलिसांनी आराेपी गुड्डू शहा याच्याविरुद्ध सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.