अश्लील कंटेटमुळे पाच ओटीटी प्लॅटफॉर्म्स बंद

केंद्र सरकारची मोठी कारवाई

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Five OTT platforms shut down due to pornographic content मनोरंजनाच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील ॲप्स आणि संकेतस्थळांवर केंद्राने बडगा उगारला असून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पाच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पूर्ण बंदीची कारवाई केली आहे. या प्लॅटफॉर्म्सवर लैंगिक दृश्यांवर आधारित मजकूर प्रसारित केला जा त असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या अंतगंत केंद्र सरकारने मूडएक्सव्हीआयपी, कोयल प्लेप्रो, डिजी मुव्हीप्लेक्स, फील आणि जुगनू या ॲप्स/संकेतस्थळांवर कारवाई केली आहे. या ॲप्स/संकेतस्थळांवर लैंगिक संबंध दाखवणारे दृश्य आणि उत्तेजक मजकुरांचा भडिमार सुरू होता. यात भारतीय कायद्याचे उल्लंघन होत असल्याने हे प्लॅटफॉर्म्स तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कारवाई माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 69ए अंतर्गत करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार नैतिकता, सामाजिक सुव्यवस्था कवा राष्ट्रीय हिताला धोका निर्माण करणारा मजकूर इंटरनेटवरून हटवण्याचे अधिकार सरकारला आहेत. त्याचबरोबर डिजिटल मीडिया एथिक्स कोड नियम 2021 चाही आधार घेण्यात आला आहे. सरकारने सर्व इंटरनेट पुरवठादारांना स्पष्ट आदेश दिले आहेत की हे प्लॅटफॉर्म्स कोणत्याही मोबाईल, टीव्ही कवा वेब ब्राऊझरवर उपलब्ध राहू नयेत.
 
 
ott ban
 
कारवाईपूर्वी या सर्व प्लॅटफॉर्म्सना नोटीस पाठविण्यात आली होती. काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि तर काहींनी डोमेन बदलून पुन्हा तोच कंटेट सुरू ठेवला. वारंवार सूचना देऊनही सुधारणा न केल्यामुळे यावेळी थेट बंदीचा निर्णय घेण्यात आला.