टोकियो,
food-facility-for-cm-yogi-in-japan उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या जपानच्या दौऱ्यावर असून त्यांच्या भेटीला राजनैतिक आणि औद्योगिक दृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. परदेशात असतानाही आपल्या आहाराच्या नियमांमध्ये कोणतीही तडजोड न करण्याचा त्यांचा निर्धार दिसून येत आहे. जपानमध्ये त्यांच्या भोजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून संपूर्णपणे शाकाहारी आणि लसूण-कांद्याविरहित मेनू तयार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी सकाळच्या नाश्त्यात पारंपरिक जपानी ‘मिसो सूप’ची खास तयारी केली जाणार आहे. त्याचबरोबर ‘टोफू’ चीज, उकडलेल्या भाज्या आणि सोया दूध यांचा समावेश मेनूमध्ये असेल. सकाळी ते हर्बल चहा किंवा कोमट पाणी घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. food-facility-for-cm-yogi-in-japan जपानी शेफना शाकाहारी आणि लसूण-कांद्याविरहित अन्न तयार करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जपानमधील भारतीय दूतावासानेही त्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन विशेष समन्वय साधला आहे. बुधवारी जपानची राजधानी टोकियो येथे त्यांच्या आगमनानंतर त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जपानमधील भारतीय राजदूत नगमा एम. मलिक यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच यामानाशी प्रांताचे उपराज्यपाल जुनिची इशिदेरा आणि अनिवासी भारतीय प्रतिनिधींनीही त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
या दौऱ्याचा मुख्य उद्देश उत्तर प्रदेशात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करणे आणि औद्योगिक सहकार्य वाढवणे हा आहे. food-facility-for-cm-yogi-in-japan यापूर्वी सिंगापूर भेटीदरम्यान राज्याच्या शिष्टमंडळाने हजारो कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव मिळवले होते. त्याच धर्तीवर जपान दौऱ्यातही उद्योग, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात नवे करार आणि भागीदारी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या परदेश दौऱ्यांमुळे उत्तर प्रदेशला जागतिक गुंतवणुकीसाठी आकर्षक केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न अधिक बळकट होत आहे.