हिंदू मंदिर ज्ञानाच्या चौथर्‍यावर उभारलेले त्यागाची संस्कृती : अतुल शेंडे

*शिवमंदिरात विशाल हिंदू संमेलन

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
हिंगणघाट, 
hindu-gathering-at-shiv-temple : हिंदू जीवनपद्धती ही सनातन संस्कृतीवर आधारित आहे. हे मंदिर ज्ञानाच्या चौथर्‍यावर उभारलेले असून त्यागाच्या कळसाने पूर्ण झालेले आहे, असे प्रतिपादन विवेक विचार मंचाचे विदर्भ प्रांत संयोजक अतुल शेंडे यांनी केले.
 
 
kl
 
 
 
स्थानिक छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवमंदिरात आयोजित विशाल हिंदू परिषदेत ते प्रमुख वते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, नगर संघचालक विनोद नांदुरकर, विद्या पेंडके यांची उपस्थिती होती. अतुल शेंडे पुढे म्हणाले की, डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने गेल्या १०० वर्षांत समाजचैतन्य जागवण्याचे कार्य संघाने केले असून जागतिक स्तरावर हिंदू समाज एकत्र येत आहे. घराघरातील मतभेद दूर करून एकात्मतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे. त्या अनुसरून प्रत्येकाने संघाने स्वीकारलेल्या कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य, पर्यावरण संरक्षण आणि स्वबोध‡समाजजीवनात व्यापक प्रसार या पंचसूत्री कार्यक्रमावर त्यांनी भर दिला. पारंपरिक आचार-विचार, सण-उत्सव आणि संयुत कुटुंब पद्धतीचे संवर्धन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 
 
संचालन नगरसेवक संजय माडे यांनी केले. कार्यक्रमापूर्वी शिवमंदिरातून एका दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. भजन मंडळींचा सत्कार ज्ञानेश्वरी, तुळशीचे रोपं, शाल श्रीफळ, हनुमान चालीसाची प्रत देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला त्रिवेदी, किशन नेभनानी, बक्षी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी दिनेश झाडे, अनिता घाईत, मोहन तुमराम, सुयोग नागुलवार, विनोद उदासी, अर्चना पतलीया, बाबू ब्राह्मणकर, आशिष देवतळे यांनी सहकार्य केले.