पाक उपांत्य किंवा अंतिम फेरीत पोहोचल्यास तिकिटांचे पैसे परत; आयसीसीची घोषणा

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,  
icc-announces-refund-of-ticket-prices टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांच्या तिकिटांची विक्री मंगळवारपासून सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी)  याबाबत घोषणा करत काही विशेष अटीही स्पष्ट केल्या आहेत. स्पर्धेच्या वेळापत्रकात संभाव्य बदल लक्षात घेऊन प्रेक्षकांना तिकीट रकमेची परतफेड करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
 
icc-announces-refund-of-ticket-prices
 
आयसीसीच्या निवेदनानुसार, जर पाकिस्तान उपांत्य किंवा अंतिम फेरीत पोहोचला आणि नियोजित स्थळात बदल झाला, तर कोलकाता किंवा अहमदाबाद येथील सामन्यांसाठी तिकीट खरेदी केलेल्या प्रेक्षकांना पूर्ण रक्कम परत दिली जाईल. त्याचप्रमाणे, श्रीलंका पात्र ठरून भारताव्यतिरिक्त इतर कोणत्या संघाविरुद्ध उपांत्य सामना खेळणार असेल, तर तो सामना कोलंबो येथे होईल आणि संबंधित स्थळासाठी खरेदी केलेल्या तिकिटांची रक्कम परत केली जाईल. icc-announces-refund-of-ticket-prices तिकिटे भारतीय वेळेनुसार मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून उपलब्ध झाली असून चार मार्च रोजी पहिला उपांत्य सामना, पाच मार्चला दुसरा उपांत्य सामना आणि आठ मार्चला अंतिम सामना होणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यासाठी आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो किंवा ईडन गार्डन्स, कोलकाता ही स्थळे निश्चित करण्यात आली आहेत, तर दुसरा उपांत्य सामना वानखेड़े स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे. अंतिम सामना मूळ नियोजनानुसार अहमदाबाद येथे होणार असला तरी पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचल्यास तो कोलंबो येथे हलवला जाईल.
जर एखाद्या प्रेक्षकाने ज्या ठिकाणासाठी तिकीट घेतले आहे तेथे सामना झाला नाही, तर त्यांना पूर्ण परतावा दिला जाईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. तिकिटांची विक्री अधिकृत संकेतस्थळावरून सुरू असून क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्यांविषयी मोठी उत्सुकता दिसून येत आहे.