ISRO शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु

रिमोट सेन्सिंग आणि जिओ-इन्फॉर्मेशन सायन्स शिकण्याची संधी

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
isro free online courses भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी शैक्षणिक संधी देत आहे. इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामध्ये रिमोट सेन्सिंग (Remote Sensing) आणि जिओ-इन्फॉर्मेशन सायन्स (Geoinformation Science) या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाईल.
 

इसरो  
 
 
हा अभ्यासक्रम ISRO च्या ‘स्पेस क्युरिओसिटी’ उपक्रमाचा भाग असून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणितातील मूलभूत माहितीचा उपयोग करून अंतराळ तंत्रज्ञानाचे अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना NCERT च्या अभ्यासक्रमानुसार रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती शिकवली जाईल.
अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्ये
  • ISRO च्या विविध केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक हे थेट वर्ग घेतील.
  • सोपी भाषा, फोटो, ॲनिमेशन आणि व्हिज्युअल टूल्स वापरून विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवले जाईल.
  • अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश असेल:
  • रिमोट सेन्सिंगची मूलतत्त्वे
  • इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (EMR)
  • जिओस्टेशनरी आणि सूर्य-समकालिक उपग्रह
  • विविध प्रकारचे रिमोट सेन्सर
  • मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर आणि त्यांचा वापर
अर्ज प्रक्रिया
विद्यार्थी इच्छुक असल्यास jigyasa.iirs.gov.in/login
या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. अर्ज करताना विद्यार्थ्यांनी खालील माहिती द्यावी लागेल:
  • वैयक्तिक माहिती (नाव, जन्मतारीख, ईमेल इ.)
  • शाळेचा तपशील
  • इतर आवश्यक शैक्षणिक माहिती
विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर अभ्यासक्रमाची सुरू होण्याची तारीख आणि इतर तपशील ईमेलद्वारे कळवण्यात येईल.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्व
हा अभ्यासक्रम विशेषतः विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञानात रुची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. यामुळे मुलांना अंतराळ संशोधनाच्या जगात पहिले पाऊल टाकण्याची संधी मिळेल.isro free online courses तसेच, रिमोट सेन्सिंग आणि GIS सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी वाढवता येतील.
ISRO चा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत असून, त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव मिळतील, जे त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला खूपच पुढे नेईल.