5 हजार महिला एकाच वेळी सादर करतील लावणी

*20 मिनिटात वीस नृत्य, गिनीज बुकात होणार नोंद

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
चंद्रपूर, 
lavani-guinness-book : उत्कृष्ट महिला मंचच्या वतीने जिल्ह्यातील 5 हजार महिला व मुली 20 मिनिटे वीस लावणी नृत्याचे सादरीकरण करून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करणार आहेत. हा जागतिक विक्रम साधण्याचा कार्यक्रम 1 मार्च रोजी येथील क्लब ग्राउंड येथे दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आल्याची माहिती मंचच्या अध्यक्ष छबु वैरागडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 
 
chan
 
 
 
त्या म्हणाल्या, महाराष्ट्राची ओळख असलेला मराठमोळ्या लावणी नृत्य प्रकाराला जागतिक पातळीवर ओळख व सन्मान मिळवून देण्याचा आणि नव्या पिढीला लावणीबद्दल आदर वाटावा यासाठीचा हा प्रयत्न आहे. मराठी भाषा समृध्द व्हावी आणि महाराष्ट्राची ओळख जागतिक स्तरावर व्हावी तसेच महिला सशक्तिकरण, संस्कृती जतन, युवा कौशल्य विकास आणि एकता यांना प्रोत्साहन मिळावे, याही उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
 
 
या कार्यक्रमाला सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग आंबटकर यांचे सहकार्य लाभले आहे. सर्व चंद्रपूरवासियांना आवर्जून उपस्थित रहावे आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन वैरागडे यांनी केले आहे.