‘लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी कायदा’ तत्काळ पारित करा

दिग्रस भाजपाकडून निवेदन

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
love-jihad-anti-illegal-conversion-act : ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी कायदा’ तत्काळ पारित करा, या आशयाचे निवेदन मंगळवार, 24 फेब्रुवारीला तहसील कार्यालयामार्फत येथील भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आले. ‘लव्ह जिहाद’ विरोधात कठोर कायदा करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, आजही दुर्दैवाने या घटना थांबलेल्या नाहीत, उलट त्यांची तीव्रता आणि क्रूरता वाढतच चालली आहे.
 
 
 
y25Feb-Nivedan
 
 
 
हा प्रकार अत्यंत गंभीर असून महाराष्ट्रात हिंदू भगिनींच्या रक्षणासाठी उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर कठोर आणि अजामीनपात्र ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी कायदा’ येत्या अधिवेशनात करण्याची मागणी दिग्रस भाजपाने दिलेल्या निवेदनात केली आहे.
 
 
तहसीलदार मयूर राऊत यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, शहराध्यक्ष अभय इंगळे, महिला आघाडी शहराध्यक्ष जागृती मेहता, मंदा श्रीवास, रमेश करवा, प्रमोद बनगिनवार, सुरेंद्र मिश्रा, सुभाष काटेकर, संतोष मांजरखेडे, संजय घरत, वाजीद शेख व रामभाऊ मार्शटवार आदी भाजपा पदाधिकाèयांसह कार्यकर्ते उपस्थित होते.