मुंबई
Rajya Sabha 2026 Maharashtra महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार आहे. विधानसभेची सध्याची सदस्य संख्या 286 असून, प्रत्येक राज्यसभेच्या जागेसाठी 36 आमदारांचा मतांचा कोटा निश्चित केला आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून संख्याबळाचे गणित सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
महायुतीकडे एकूण 232 आमदारांचा पाठिंबा असून, यामध्ये भाजपकडे करडीले यांच्या निधनानंतर 136 आमदार आहेत. या संख्येबळावरून तीन जागा निवडण्यासाठी भाजपकडे 108 मतांचा आवश्यक पाठिंबा असून, त्यांच्याकडे 28 अतिरिक्त मतांचा लाभ आहे. शिवसेनेकडे 56 आमदार असून, एक जागा मिळवण्यासाठी 36 मतांचा कोटा लागतो आणि त्यांच्याकडे 20 अतिरिक्त मतांची सोय आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे 40 आमदार असून, एक जागा मिळवण्यासाठी 36 मतांचा कोटा आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे चार अतिरिक्त मत आहेत. या गणितानुसार महायुतीकडे सात जागांपैकी अधिकाधिक जागा मिळवण्याची स्पष्ट शक्यता आहे.
दुसरीकडे, महाविकास Rajya Sabha 2026 Maharashtra आघाडीचे एकूण संख्याबळ 52 आमदारांचे असून, पक्षांनिहाय गणित थोडे वेगळे आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडे 20 आमदार असून, एका जागेसाठी त्यांना 16 अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 10 आमदार असून, एका जागेसाठी त्यांना 26 अतिरिक्त मतांची गरज आहे. काँग्रेसकडे 16 आमदार असून, एका जागेसाठी 20 अतिरिक्त मतांची गरज भासत आहे. या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
राज्यसभा निवडणुकीत पक्षांचे संख्याबळ, आमदारांचे मतदान आणि कोट्यांच्या गणितानुसार अंतिम निकाल महत्त्वपूर्ण ठरेल. खासदार आणि विधानसभेतील पक्ष नेते यांचे मतमंथन या आठवड्यात अधिक गती पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 16 मार्चच्या मतदानाचे परिणाम महाराष्ट्रातील राजकीय संतुलनावर मोठा प्रभाव टाकू शकतात.